दी केरला स्टोरी ने शाहरुख च्या पठाण ला देखील टाकले मागे

#thekeralastory #pathaan #shahrukhkhan

दी केरला स्टोरी सिनेमा ५ मे ला रिलीज झाला . खूप वाद देखील झाला . या वादाचा फिल्म ला फायदाच होताना दिसला. आता पर्यंत या सिनेमा ने भारतामध्ये २३० कोटींची कमाई केली आहे. ही तब्बल १ महिन्याची कमाई आहे.

दी केरला स्टोरी सिनेमा ने चौथ्या आठवड्यात कमाई करण्यात शाहरुख खान च्या ब्लॉकबस्टर सिनेमा पठाण ला देखील मागे टाकले आहे . त्याच्या पेक्षा जास्त कमाई केली आहे. पठाण सिनेमा ने चौथ्या आठवड्यात १४.३३ कोटी रुपये इतकी कमाई केली होती. परंतु दी केरला स्टोरी ने चौथ्या आठवड्यात तब्बल १८.२५ कोटींची कमाई केलेली आहे. पहिल्या आठवड्यात डोमेस्टिक कलेक्शन 81.14 कोटी होते. दुसऱ्या आठवड्यात ‘केरळ स्टोरी’ने 90.58 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात 41.75 कोटींचा व्यवसाय केला. पाचव्या आठवड्यातील दोन दिवसांचे कलेक्शन 2.5 कोटी इतके होते. या चित्रपटाने 30 दिवसांत एकूण 234 कोटींची कमाई केली आहे.

दी केरला स्टोरी आठवड्यांचे कलेक्शन

पहिला आठवडा – 81.14 कोटी

दुसरा आठवडा – 90.58 कोटी

तिसरा आठवडा – 41.75 कोटी

चौथा आठवडा – 18.25 कोटी

5वा आठवडा – 2.5 कोटी (फक्त 2 दिवस)

एकूण – 234 कोटी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top