IPO म्हणजे काय आणि त्या साठी कसा अर्ज करायचा त्याची प्रोसेस असते sharemarket marathi

आयपीओला अर्ज कसा करावा (how to apply for IPO):

प्रथम तुमच्याजवळ पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. ते डीमेट अकाउन्ट चालू करण्यासाठी आवश्यक आहे . डिमेट अकाउन्ट चालू केल्यावर आपण IPO आयपीओला अर्ज करू शकतो. जे आपल्याला शेअर दलालाकडून किंवा बँकेतून अथवा शेअरबाजारातून मिळते. त्याच्यामध्ये आवश्यक ती माहिती नमूद करून पेमेंट आणि अर्ज ज्या बँकेत स्वीकारले जातात तिथे भरले जातात.

आयपीओला अप्लाय करण्याआधी कंपनीची तपासणी कशी करावी व कोणते मुद्दे लक्षात घ्यावे ते पुढील प्रमाणे.


आयपीओला अर्ज करताना खालील मुद्दे काळजीपूर्वक अभ्यासा.

• कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे.ते योग्य आहेत की नाही कंपनी केव्हा सुरू झाली अथवा केव्हा सुरू होणार आहे . हे पहा.
• कंपनीचे प्रकल्प ,जमीन , मशिनरी , कच्चा माल, विक्रीची व्यवस्था यावर लक्ष दया.
• कंपनीचे एकूण भांडवल किती आहे आणि कंपनी त्यात वाढ करणार आहे का ते तपासावे . यात संस्थापकांचे फायनॅन्शिअल इन्स्टिट्यूशन आणि जनता या प्रत्येकाचे योगदान किती आहे ते पाहावे .
• कंपनीत कोणत्याही प्रकारे टेक्निकल कोलँबोरेशन असल्यास त्याची माहिती मिळवावी.
• सरकारने उत्पनावरील कर विक्रीकर एक्साईज ड्यूटी यात कंपनीला काही सुट दिली आहे का ते पाहावे.
• विक्रीचे व्यवस्थापन आणि वस्तूची मागणी देशातच आहे की विदेशी सुद्धा आहे हे पाहावे .

जर वरील मुद्दे काळजीपूर्वक अभ्यासले तर तेथे अर्ज केल्यानंतर काही समस्या येत नाही.

कंपनीच्या शेअरच्या वितरणास योग्य प्रतिसाद नाही मिळाला तर (If The Issue Is Not Fully Paid):

जर आयपीओला प्रतिसाद पुरेसा मिळाला नाही तर विभागणी (Allotment) सुरू केली जात नाही. सेबीच्या नियमांप्रमाणे ९०% अमाउन्टची व्यवस्था आयपीओ बंद झाल्यापासून ६० दिवसांत संस्थापकाचे (pomoters) केली पाहिजे. जर का संस्थापक या दिवसात ही व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकले नाही तर पुढच्या १० दिवसात आयपीओ अर्जदारांना त्यांचे पैसे १५% व्याजाने परत करावे लागतात.

जादा अर्ज भरपाई ( Surplus Application Money):

जर दिलेल्या अर्जात वितरणासाठी मिळालेले अर्ज कंपनीने नमूद केलेल्या भागवितरणापेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास कंपनीला ते पैसे आठ दिवसात संबंधीत अर्जदारांना परत करावे लागतात . जर या कामात संस्थापकांना विलंब झाला तर कंपनीला ते पैसे १५% व्याजाने परत करावे लागतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top