मूच्याल फंड मधील SIP म्हणजे काय अगदी सोप्या शब्दात समजून घ्या

WHAT IS SIP & IT’S BENEFITS

थेंबे थेंबे तळे साचे”: एक प्रसिद्ध मराठी म्हण. चांगले जीवन जगण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याकडे गरजेइतकी संपत्ती जमा व्हावी असे प्रत्येकास वाटत असते. दर महिन्याला येणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम कुठल्यातरी गुंतवणूक योजनेत गुंतवावी असे वाटत असते. गुंतवणूक सुरक्षितही असावी आणि परतावा चांगला मिळावा अशी अपेक्षा असते. दैनंदिन जीवनात चांगले आरोग्य राहावे म्हणून आपण नियमित व्यायाम करतो तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नियमित गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी म्युच्युअल फंडाची systematic investment plan (SIP) चालू करता येते. रुपये 500 किंवा 1,000 इतक्या कमी रकमेची SIP चालू करून आपण गुंतवणूक करू शकतो. आपण आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit) मध्ये पैसे ज्या प्रकारे गुंतवतो त्याप्रकारे आवर्ती ठेव योजनेस (Recurring Deposit) साधर्म्य असणारी systematic investment plan (SIP)पद्धतशीर गुंतवणूक योजना किफायतशीर आहे.

        दर महिन्याला समान रक्कम SIP मध्ये गुंतवता येते. यामधून नियमित गुंतवणुकीची शिस्त लागते. आणि कमी रकमेमध्ये आपला पोर्टफोलिओ तयार व्हायला सुरुवात होते. यामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे, आपण दर महिन्याला किती रक्कम गुंतवणार आहोत हे ठरवा. मगच गुंतवणुकीला सुरुवात करा.

SIP योजनेत पैसे गुंतवण्याचे महत्वाचे फायदे:

चक्रवाढ गतीची शक्ती:

नियमित गुंतवणूक होत असल्यामुळे मिळणाऱ्या फायदा हा पुनर्गुंतवणूक होत असतो. गुंतवणूक अधिक फायदा या दोन्हीवर पुन्हा उत्पन्न चालू होते. म्हणून शक्यतो लवकर गुंतवणुकीस सुरुवात करा म्हणजे चक्रवाढ गतीचा फायदा अधिक मिळेल

गुंतवणुकीस शिस्त:

दर महिन्याला आपण विशिष्ट रक्कम SIP च्या मध्यमातून गुंतवणूक करत असतो. याचा अर्थ आपल्या गुंतवणुकीस एक विशिष्ठ शिस्त लागते. कारण दर महिन्याला हि रक्कम भरणे बंधनकारक असते त्यामुळे गुंतवणूकीस प्राधान्य मिळते.

सरासरी चा फायदा:

म्युचुअल फंडमधील गुंतवणूक हि बाजाराचे अधीन असते म्हणजे त्यात चढ उतार होत असतो. प्रत्येक गुंतवणुकीत आपणास त्या फंडाचे युनिट्स मिळतात. प्रत्येकवेळी समान गुंतवणुकीस युनिट्सची NAV हि वेगळी असल्यामुळे युनिट्स कमी अधिक मिळतात.

सुलभता:

यामध्ये मार्केट च्या वेळेतच गुंतवणूक करावी असे काही बंधन नसते. आपण हि रक्कम आपल्या बचत खात्याला जोडून घेऊ शकतो Electronic clearance – ECS (Auto debit facility) . म्हणजे प्रत्येकवेळी भरणा करण्याची किंवा भरणा चुकण्याची चिंता राहत नाही. आपण पोस्ट डेटेड चेकनेही व्यवहार करू शकतो.

छोट्या गुंतवणुकदारांनाही फायदा:

छोटे गुंतवणूकदार यामध्ये अगदी ५००, १००० रुपये दर महिन्याला भरून सहभागी होऊ शकतात. यामुळे कमी रक्कम असूनही पोर्टफोलिओ चांगला बनतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top