मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजना मेळावा’ आयोजित केला जाईल. या मेळाव्याचा हजारो लोकांना होणार लाभ.

#सरकारीयोजना #नोकरी #महाराष्ट्र

पात्र लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या माध्यमातून ‘सरकारी योजना मेळावा’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांचा मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. या सरकारी योजनांचा लाभ किमान ७५ हजार लाभार्थ्यांना मिळणार .

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ जलद, कमी कागदोपत्री आणि शासनाने निश्चित केलेल्या शुल्कात दिला जाईल. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी तीन दिवस एकाच ठिकाणी राहणार आहेत. योजनांचा लाभ मिळणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, योजनांची माहिती देणे हा या मेळ्याचा मूळ उद्देश आहे. अधिकाऱ्यांना मेळ्याच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधता येणार आहे.

याद्वारे जनतेच्या समस्या जवळून पाहता येतील आणि त्या समस्यांवर उपाय शोधता येतील. पात्र व विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना योजना मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम जिल्हानिहाय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे.

प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही. त्यादृष्टीने शासकीय योजनांची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी, यासाठी सर्व अधिकारी व जनतेला एका छताखाली एकत्र आणून विविध योजनांचा लाभ जनतेला मेळाव्याच्या स्वरूपात दिला जाणार आहे. या मेळाव्यानुसार सर्व विभाग त्यांच्या योजना आणि शासनाच्या निर्णयांची माहिती तयार करतील. योजनेनुसार, लाभार्थ्यांची निवड आणि त्यांचे अर्ज भरण्याची तयारी करावी लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top