दूरदर्शन वरील ऑल इंडिया रेडिओ च्या पहिल्या इंग्लिश न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन , गीतांजली अय्यर यांचा जीवनप्रवास

अय्यर यांनी टीव्ही न्यूज इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, 1976 मध्ये कोलकात्याच्या लॉरेटो कॉलेजमधून पदवी पूर्ण केल्यानंतर 1976 मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केला.बातम्यांव्यतिरिक्त, अय्यर थिएटरमध्ये देखील सामील होत्या त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा मिळवला होता.

अय्यर सुरोजित सेन आणि पामेला सिंग यांसारख्या लोकांच्या रेडिओवर बातम्या एकत असत त्याचा त्यांच्यावर जीवनावर खूप प्रभाव पडला.

अय्यर 1970 च्या दशकाच्या मध्यात देशभरात प्रचंड प्रभावशाली होत्या , त्यापूर्वी दूरदर्शनवर फक्त चित्रहार आणि कृषी दर्शन सारखे कार्यक्रम टेलिकास्ट व्हायचे

अय्यर, त्यांच्या पिढीतील टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होत्या , सलग चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार जिंकला. १९८९ मध्ये त्यांना उत्कृष्ट महिला हा इंदिरा गांधी प्रोयदर्शनी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

त्यांनी डीडी वरील खानदान या टीव्ही मालिकेत देखील काम केले आहे. टीव्हीवरील त्यांच्या कारकिर्दी व्यतिरिक्त, अय्यर अनेकदा छापील जाहिरातींमध्ये दिसायच्या.न्यूज रीडर म्हणून त्यांच्या कारकिर्दीनंतर , अय्यर यांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेल गट तसेच CII आणि वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF) साठी देखील काम केले.

अय्यर पार्किन्सन्स आजाराने त्रस्त होत्या . फेरफटका मारून घरी परतल्यानंतर अय्यर कोसळल्या. अय्यर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले , परंतु वाटेत त्यांचे निधन झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top